रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ६२.५२ टक्के मतदान : निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ६२.५२ टक्के मतदान झाले आहे. ४ लाख ५९ हजार ९९ इतक्या पुरुष, तर ४ लाख ४८ हजार ५१८ इतक्या महिला अशा एकूण ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला,” अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. चिपळूण विधानसभा मतदारसंघात ७६ हजार ७२१ पुरुष, ७८ हजार ३०६ महिला असे एकूण १ लाख ५५ हजार २७ (५७.४६ टक्के), रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ८५ हजार ५६४ पुरुष, ८६ हजार ५७४ महिला, इतर १ असे एकूण १ लाख ७२ हजार १३९ (६०.७१ टक्के), राजापूर विधानसभा मतदारसंघात ६७ हजार ४६० पुरुष, ७३ हजार ५७३ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ३३ (६०.३४ टक्के), कणकवली विधानसभा मतदारसंघात ७७ हजार ४७ पुरुष, ७३ हजार २७३ महिला असे एकूण १ लाख ५० हजार ३२० (६६.०१ टक्के), कुडाळ विधानसभा मतदारसंघात ७३ हजार ३४९ पुरुष, ६६ हजार ५०७ महिला असे एकूण १ लाख ३९ हजार ८५६ (65.86 टक्के), सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ७८ हजार ९५८ पुरुष, ७० हजार २८५ महिला असे एकूण १ लाख ४९ हजार २४३ (६६.४९ टक्के) असे एकूण ६२.५२ टक्के मतदान झाले.
या लोकसभा मतदारसंघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही एकूण टक्केवारी ६२.५२ आहे.
या लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण २ बीयु, २ सीयु आणि १७ व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. यात चिपळूणमध्ये १ बीयु, १ सीयु, व्हीव्हीपॅट ४, रत्नागिरीमध्ये १ व्हीव्हीपॅट, राजापूरमध्ये १ बीयु, १ सीयु, २ व्हीव्हीपॅट, कणकवलीमध्ये ५ व्हीव्हीपॅट, कुडाळमध्ये ३ व्हीव्हीपॅट, सावंतवाडीमध्ये २ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले.



