मॉकपोल दरम्यान केवळ ॰.८२ टक्के इव्हीएम रिप्लेस

रत्नागिरी : “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजारा ९४२ मतदान केंद्रावर ७ मे रोजी सकाळी झालेल्या मॉकपोलमध्ये ०.८२. टक्के बॅलेट युनिट, ०.३६ टक्के सीयु आणि ०.७७ टक्के व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. उत्तम प्रशिक्षण घेतल्यामुळे आणि सर्वोत्तम नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सर्वत्र सुरळीत पार पडत आहे,” अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
आज सकाळी झालेल्या मॉकपोल दरम्यान एकूण १ हजार ९४२ मतदान केंद्रांवर चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये १ बीयु, ४ व्हीव्हीपॅट, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ५ बीयु, १ सीयु आणि २ व्हीव्हीपॅट, राजापूर विधानसभा मतदारसंघात १ बीयु, १ सीयु आणि २ व्हीव्हीपॅट, कणकवलीमध्ये १ बीयु, १ व्हीव्हीपॅट, कुडाळमध्ये ६ बीयु, ४ सीयु आणि ४ व्हीव्हीपॅट आणि सावंतवाडी २ बीयु, १ सीयु, १ व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. हे प्रमाण एकूण मतदान केंद्राच्या केवळ ०.८२ टक्के बॅलेट युनिट, ०.३६ टक्के सीयु आणि ०.७७ टक्के म्हाणजेच १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मॉकपोलनंतर सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.



