लोकसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली असून त्याचा तारीखवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जीवन देसाई, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १९ एप्रिल २०२४ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुटी वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला, वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.



