मुख्य बातमी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे उद्या शिवजन्मोत्सव सोहळा

रत्नागिरी : शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे उद्या (ता. २८) शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात सकाळी सहा वाजता रत्नदुर्ग किल्ला ते शिवतीर्थ मारुती मंदिर अशी शिवज्योत दौड होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता शिवतीर्थ मारुती मंदिर येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात येणार आहे. या प्रसंगी जास्तीत जास्त शिवभक्त, हितचिंतकांनी उपस्थित राहून यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे करण्यात आले आहे.



