राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीचे ‘संगीत अमृतवेल’ तृतीय
६२ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या निकालांची घोषणा

रत्नागिरी : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली असून, यात रत्नागिरीतील खल्वायन संस्थेच्या ‘संगीत अमृतवेल’ या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई या संस्थेच्या ‘संगीत जय जय गौरीशंकर’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, तर सान्वी कलामंच (गोवा) या संस्थेच्या ‘संगीत संत कबीर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल असे- दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक घनश्याम जोशी (नाटक- संगीत जय जय गौरीशंकर), द्वितीय पारितोषिक जयेंद्रनाथ हळदणकर (नाटक- संगीत संत कबीर). नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक देव हरमलकर (नाटक- संगीत संत कबीर), द्वितीय पारितोषिक श्रीकृष्ण जोशी (नाटक- संगीत अमृतवेल). संगीतकार : प्रथम पारितोषिक शिवानंद दाभोळकर (नाटक- संगीत संत कबीर), द्वितीय पारितोषिक राम तांबे (नाटक- संगीत अमृतवेल). नेपथ्य : प्रथम पारितोषिक प्रदीप तेंडुलकर (नाटक- संगीत अमृतवेल), द्वितीय पारितोषिक मनस्वी हरमलकर (नाटक संत कबीर), संगीतसाथ आर्गनवादक : प्रथमोषिक हर्षल काटदरे (नाटक- संगीत जय जय गौरीशंकर), द्वितीय पारितोषिक स्वानंद नेने (नाटक- संगीत अमृतवेल). संगीतसाथ तबलावादक : प्रथम पारितोषिक हेरंब जोगळेकर (नाटक- संगीत अमृतवेल), द्वितीय पारितोषिक अथर्व आठल्ये (नाटक- संगीत जय जय गौरीशंकर). उकृष्ट अभिनेते रौप्यपदक पुरुष- अनिकेत आपटे (नाटक- संगीत अमृतवेल), अरुण कदम (नाटक- संगीत घाशीराम कोतवाल) आणि उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री- अनुष्का आपटे (नाटक- संगीत लावणी भूलली अभंगाला), समीक्षा मुकादम (नाटक- संगीत जय गौरी शंकर). संगीत गायन रौप्यपदक पुरुष विशारद गुरव (नाटक- संगीत जय जय गौरी शंकर), प्रवीण शिलकर (नाटक- संगीत अहम देवयानी). संगीत गायन रौप्यपदक स्त्री शारदा शेटकर (नाटक- संगीत सन्यस्त खड्ग), सावनी शेवडे (नाटक- संगीत अमृतवेल).
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : करुणा पटवर्धन (नाटक- संगीत ययाती देवयानी), देवश्री शहाणे (नाटक- संगीत जय जय गौरीशंकर), अक्षता जोशी (नाटक- संगीत संभवामी युगे युगे), आध्या कारखानीस (नाटक- संगीत संत कबीर), प्रान्वी गणपूले (नाटक- संगीत चला आळंदीला), अभिजीत केळकर (नाटक- संगीत आरंभी स्मरितो पाय तुझे), नितीन कोलवेकर (नाटक संगीत प्राक्तन योग), गुरुप्रसाद आचार्य (नाटक- संगीत जय जय गौरीशंकर), दशरथ नाईक (नाटक- संगीत संत कबीर), विश्वास पांगारकर (नाटक- संगीत लावणी भूलली अभंगाला). गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : वेदवती परांजपे (नाटक- संगीत आरंभी स्मरितो पाय तुझे), श्रीजी पडते (नाटक- संगीत अहंम देवयानी), श्रद्धा जोशी (नाटक- संगीत संत कबीर), जानवी खडपकर (नाटक- संगीत धाडीला राम तिने का वनी), यशश्री जोशी (नाटक- संगीत आरंभी स्मरितो पाय तुझे), सुरज शेटगावकर (नाटक- संगीत चला आळंदीला), गिरीश जोशी (नाटक- संगीत धाडीला राम तिने का वनी), साईराज कोलवाळकर (नाटक- संगीत अहंम देवयानी), अनामय बापट (नाटक- संगीत अमृतवेल), वज्रांग आफळे (नाटक- संगीत लावणी भूलली अभंगाला).
कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२४ या कालावधीत जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय कुलकणी, अनिरुध्द खरे, दीप चहांद, श्रीमती योजना पाटील आणि मंगेश नेहरे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.



