रत्नागिरीत १८ जुलैला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

रत्नागिरी : जिल्ह्यातील युवक व युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी येथे कॅम्पस इंटरव्ह्यूप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/अॕप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये CONNEQT BUSINESS SOLUTIONS, RANDSTAD INDIA LTD, SUMMET FACILITIES LIMITED, USV PRIVATE LIMITED, GADRE MARINE EXPORT PVT. LTD आदी कंपन्यानी ५०० पेक्षा अधिक रिक्तपदांची मागणी नोंदविलेली आहे.
रोजगार मेळाव्यात एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, बीएससी व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने १६ जुलै रोजी मुलाखतीस सामोरे जाण्यासाठी १ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात मुलाखत मार्गदर्शन, शिकाऊ उमेदवारी कायदा (Apprenticeship Act) व आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी यांच्या सभागृहात सकाळी १० ते २ वाजता या वेळेत केले आहे.
या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment Job Seeker (Find A Job ) Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-१ Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. ज्या उमेदवारांची नोंद संकेतस्थळावर नाही अशा उमेदवारांची प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करण्यात येईल, त्यासाठी आधार कार्ड व शैक्षणिक पात्रतेची आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत.
रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २९९३८५ किंवा दिपक लोंढे, वरिष्ठ लिपिक यांचे ८९९९०८९३२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.



