शैक्षणिक

12 वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज (दि. 27) पासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. आज सकाळी 11 वाजलेपासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहेत.

तसेच विद्यार्थ्यांना www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, या बद्दल काही तांत्रिक अडचणी असल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी थेट उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

तसेच, महाविद्यालयाने हॉल तिकीटची प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असं देखील मंडळाने सांगितलं आहे. यंदाची बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणार असून, 12 वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून आपली स्वतःची स्वाक्षरी करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button