जेष्ट पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते कोंकण दिनांक वेब पोर्टलचे अनावरण

रत्नागिरी २६
कोकण दिनांक साप्ताहिक एका नव्या वेब स्वरुपात आज प्रजासत्ताक दिनी प्रकाशित करण्यात आले. आज कोकण दिनांक वेब पोर्टल आंतरराष्ट्रीय किर्तीचे जेष्ट पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते पोर्टलचे क्लिक करुन सुरु करण्यात आले.
कोकण दिनांक हे १९९६ पासून रत्नागिरीतून प्रकाशित होणारे साप्ताहिक. गेल्या २५-२६ वर्षात कोकण दिनांक साप्ताहिकाने दिवाळी अंकाची एक वैचारीक प्रगल्भ आवड आणि प्रतिमा जोपासली. कोकणच्या वैविध्यतेवर कोकण दिनांकचे दिवाळी विशेषांक हे या सप्ताहिकाचे वैशिष्ठ्य आहे. यात पर्यटन, समुद्र, लोककला, संस्कृती, साहित्य आदी विविध विशेषांकाने कोकणच्या कलात्मक सौदर्यात मोलाची भर घातली घातली आहे.
कोकण दिनांकचे वेब पोर्टल सुरु करतांना कोकण दिनांक हे कोकणवासीयांसांठी व्यापक व्यासपीठ होऊ इच्छिते. या माध्यमातून कोकणवासीयांचे विविध प्रश्न, येथील राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, साहित्य आदी विविध उप्रकम त्यावरील न्यूज पेक्षा ही त्याबाबतचे व्हूज , विविध सदरे या माध्यमातून कोकणवासीयांसाठी घेऊन येणार आहेत. हे न्यूज पोर्टल खऱ्या अर्थाने प्रत्येक कोकणवासीयांचे स्वतःचे आपले असे न्यूज पोर्टल असणार आहे. आपल्या विविध गुणांसाठी आणि अभिव्यक्त होण्यासाठी हा प्रमुख विचारमंच असेल असे यावेळी संपादक अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले.



