महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

पुढील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन्सची – मुख्यमंत्री 

मुंबई  : देशाच्या सकल स्थूल उत्पन्नामध्ये राज्याची हिस्सेदारी सातत्याने वाढत असून विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट हे केवळ पुस्तक न ठेवता येत्या चार ते पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या घरामध्ये नेण्याचा आमचा उद्देश आहे, त्यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, वित्तीय तूट खाली आणणं आणि संसाधनांचे योग्य नियोजन करणे ही आमची यासाठीची उद्दिष्टे आहेत अशी अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणा वरील आभार प्रदर्शक प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते

आपल्या राज्याची अर्थव्यवस्था 2013 साली तेरा लाख कोटींची होती त्यात तिप्पट वाढ होऊन ती आता 51 लाख कोटींची आहे यामुळे पुढील चार ते पाच वर्षात दुष्काळ पडला नाही तर एक लाख कोटींची अर्थव्यवस्था करण्याचा उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दावोसच्या गुंतवणुकीसाठी योग्य असणाऱ्या वातावरणात आता महाराष्ट्राची ही मोठी चर्चा आहे, दावोस मध्ये करण्यात आलेल्या करारांचा अंमलबजावणी दर सातत्याने वाढत असून देशात देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी 39 टक्के गुंतवणूक आपल्या राज्याची आहे. आपलं राज्य देशात गुंतवणुकीबाबत पहिला क्रमांकावरती आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यातील बेरोजगारीचा दर 2022 साली चार टक्के होता तो आता 3.1% वरती खाली आला आहे. देशातील 20% नोंदणीकृत स्टार्टअप आपल्या राज्यात असून देशातील 119 पैकी 28 मोठे उद्योजक आपल्या राज्यातून या स्टार्टअप मधून तयार झाले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. नाशिक कुंभमेळ्याच्या निमित्ताने जगभरात आपलं ब्रॅण्डिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे, या ठिकाणी करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा जास्त प्रमाणात परतावा आपल्याला मिळतो आणि ही गुंतवणूक कायमस्वरूपी असून शाश्वत विकासासाठी ती केली जाते असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button