
गुहागर : तालुक्यातील मुंढर मुख्य रस्ता ते मुंढर खुर्द ओळवन वाडी- आडीवाडी रस्त्यावरील मोरी खचली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते खचणे, मोऱ्या खचणे, तसेच घरावर किंवा रस्त्यावर झाडं कोसळणे यांसारख्या घटना घडत आहेत. आज (१८ जुलै) झालेल्या पावसामुळे तालुक्यातील मुंडर मुख्य रस्ता ते मुंडर खुर्द वळवणवाडी रस्त्यावरील मोरी खचल्याचे निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ या भागातील एसटी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असून, लवकरात लवकर यावर कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा आहे.



