मुख्य बातमी

जिल्ह्यात २ लाख २० हजार अर्ज दाखल; ७४.९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाईन ५७ हजार २६९, तर ऑफलाईन पध्दतीने १ लाख ६२ हजार ८०८ अर्ज असे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे. जिल्ह्याला एकूण असलेल्या उद्दिष्टांपैकी ७४.९४ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून २९ हजार ९३७ उद्दिष्टांपैकी २८ हजार ९०४ अर्ज प्राप्त झाले असून, हे प्रमाण ९६.५५ टक्के आहे.

महिलांना सक्षम करण्यासाठी, महिला भगिनी घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरू आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट, प्राप्त अर्ज संख्या आणि टक्केवारी अशी : मंडणगड ८ हजार २६६ उद्दिष्टांपैकी ६ हजार ६१४ अर्ज प्राप्त झाले असून, हे प्रमाण ८०.०१ टक्के आहे. दापोली ३६ हजार ५४७ पैकी २५ हजार ९५४ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ७१.०२ टक्के आहे. खेडमध्ये ३५ हजार ५०५ पैकी १८ हजार ४७२ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ५२.०३ टक्के आहे. चिपळूण तालुक्यात ३४ हजार ३२३ पैकी २९ हजार ७१९ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ८६.५९ टक्के आहे. गुहागर तालुक्यात २९ हजार ७६६ पैकी १७ हजार ६०६ अर्ज प्राप्त झाले असून, हे प्रमाण ५९.१५ टक्के आहे. संगमेश्वर तालुक्यात ३८ हजार ७१६ पैकी २७ हजार ४०२ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ७०.७८ टक्के आहे. रत्नागिरी तालुक्यात ६१ हजार २५१ पैकी ४८ हजार ७७२ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ७९.६३ टक्के आहे. लांजा तालुक्याला १९ हजार ३६५ पैकी १६ हजार ६३४ अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण ८५.९० टक्के आहे. राजापूर तालुक्यात २९ हजार ९३७ पैकी २८ हजार ९०४ अर्ज प्राप्त झाले असून, हे प्रमाण ९६.५५ टक्के आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button