मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

संगमेश्वर महाविद्यालयात ६ फेब्रुवारीला रंगणार ‘द फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ फूड फेस्टिव्हल

संगमेश्वर: येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘द फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या सोहळ्यासाठी चिपळूण नगरपालिकेचे बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष मा. कपिल शिर्के, संगमेश्वर येथील ज्येष्ठ उद्योजिका मनीषा रहाटे, कु. श्रुती कापडी (आर.के. फूड प्रोसेसिंग – मँगो कॅनिंग युनिट) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अभिजित हेगशेट्ये आणि संचालिका मा. सीमा हेगशेट्ये यांचेही मार्गदर्शन याप्रसंगी लाभणार आहे.

या उपक्रमात विविध प्रकारचे चविष्ट ‘स्ट्रीट फूड’ सादर केले जाणार असून, त्याचे स्टॉल्स लावले जातील.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण आणि हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागप्रमुख प्रा. भिकाजीराव बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन तृतीय वर्ष बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी केले आहे

स्थानिक नागरिक आणि खाद्यप्रेमींनी या ‘फूड फेस्ट’चा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button