नवनिर्माण तर्फे परदेश शिक्षण तंत्रज्ञान
रत्नागिरी : नवनिर्माण महाविद्यायाला परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करणार असून येथील विद्यार्थ्यांना थेट परदेशात उच्च शिक्षणाची संधी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठीचा मेगा प्लॅन २०२६ मध्ये राबविणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, तंत्रज्ञान याचे आदानप्रदान होईल. असे नवनिर्माण शिक्षण संस्था चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या २०२६ च्या बॅचच्या ओरीएंटेशन प्रसंगी सांगितले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ डॅाक्टर नवनिर्माण उपाध्यक्ष डॅा. अलिमिया परकार , डॅा. मनिषा भागवत, डॅा. दिलीप पाखरे, डायेक्टर ऋतुजा हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये , डॅा. अनघा, डॅा. जाई,डॅा. प्रतिक्षा तसेच राज्याच्या मुंबई पुणे आदी २० जिल्ह्यातून आलेले नव्या बॅचचे ६० विद्यार्थी , पालकवर्ग उपस्थित होते.
एस एम जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे हे दुसरे वर्ष , या महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकवर्ग अद्यावत लॅबरोजटरीज आणि रत्नागिरी शहराच्या निसर्गसुंदर आकर्षण यामुळे महाराष्ट्रातील मुले रत्नागिरी येथील प्रवेशाला प्रथम प्राधान्य देतात असा अनुभव यावेळी सांगण्यात आला. फिजिओथेरपी क्षेत्राचे महत्व आरोग्य क्षेत्रात महत्वाचा रोल करत आहे. याबद्दल मार्गदर्शन करतांना जेष्ठ डॅाक्टर आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॅा. अलिमियाँ परकार यांनी सांगितले, न्यूरो, आर्थो, हार्ट ॲापरेशन, स्पोर्टस आदी प्रत्येक क्षेत्रात आज फिजिओथेरपी तज्ञ डॅाक्टर्सची नितांत गरज आहे.
ही फक्त रत्नागिरी महाराष्ट्र यापुरती मंर्यादित रहाणार नाही तर देशात आणि परदेशात या क्षेत्राला मोठी मागणी आहे. आजचा बदलता अभ्यासक्रम हा मेडीकलचा बहुतांश अभ्यासक्रम कव्हर करणारा आहे. रत्नागिरी येथे अशा प्रकारची शिक्षणाची सुविधा होणे हे आपण सारे विद्यार्थी भाग्यवान आहात. फिजिओथेरपी महाविद्यालयाने रत्नागिरीच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्याधारीत दर्जाचा आयाम बदलत आहे. आरोग्य क्षेत्रातील नवी आव्हाने आपणाला सामोरे जायचे यासाठी फिजीओ आणि त्यातील रिहॅबिलीटेशन बाबतचे संशोधन त्याला जोडून येणारे आर्टीफीशीअल इंजिनिअरीग या क्षेत्रातील नव्या क्रांतीचे पर्व घेऊन येणार आहे. यावेळी फिजिओथेरपीस्ट डॅा.मनिषा भागवत आणि डॅा.दिलीप पाखरे यांची समयोचित भाषणे झाली.
महाविद्यालयाच्या डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना सोबत आलेल्या पालकांना येथील शैक्षणिक उच्च दर्जा आणि आनंदी आणि सुरक्षित वातावरण तसेच तज्ञ प्राध्यापकांचे योगदान या बाबत आश्वस्थ केले. यावेळी मुंबई पुणे आदी मोठ्या शहरातून आलेल्या पालकांनी रत्नागिरीच्या शैक्षणिक विकासाबाबत विशेष गौरवोद्गार व्यक्त केले. सुम्रद किनारी असणाऱ्या सुंदर रत्नागिरी शहराचे आकर्षण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मुलांचे विशेष आकर्षण होते.



