खेकडा शेती प्रकल्पास शासकीय प्रोत्साहन आवश्यक — डॉ. केतन चौधरी

Sign in
Welcome!Log into your account
your username
your password
Forgot your password?
Create an account
Sign up
Welcome!Register for an account
your email
your username
A password will be e-mailed to you.
Password recovery
Recover your password
your
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यात खेकड्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे खेकडा पालन या व्यवसायाला मोठे भविष्य आहे. तसेच खेकडे पालन करण्यारा शेतकर्यांच्या मागणीनुसार भविष्यात खेकडा पालन हा प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेत समावेश केल्यास खेकडा शेतीतून स्वयं-रोजगार संधी आणि पर्यावरण पूरक व्यवसाय उपलब्ध होईल. या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन केंद्राचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेकडा पालन या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी सुरक्षितपणे खेकडा पकडता येणे आवश्यक आहे तसेच सर्वांनी एकत्रीत होऊन खेकडा समुदाय गट तयार केल्यास आपल्या उद्योगाला कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी खेकडा पालनातील आपले अनुभव कथन केले. प्रादेशिक कृषी कार्यालय, बर्डेझ, गोवा चे कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर उपस्थित होते. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. हरीश धमगाये, अभिरक्षक, प्रा. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी, आणि श्रीमती वर्षा सदावर्ते, जीवशास्रज्ञ हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती अपूर्वा सावंत यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान खेकड्यांच्या विविध जातींची ओळख व जीवनचक्र’ आणि ‘खेकडा पालनः विविध पध्दती’ याविषयी श्रीम. वर्षा सदावर्ते, तर ‘खेकडा पालन व्यवस्थापन संच निर्मिती आराखडा’ आणि ‘जिवंत खेकडा पालन: हाताळणी आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. हरीष धमगाये यांनी मार्गदर्शन केले, ‘खेकडा पालनः पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे व्यवस्थापन’ याविषयी श्रीम. अपूर्वा सांवत, ‘खेकडा खादय व्यवस्थापन’ आणि ‘खेकडा पालनः विक्री व्यवस्थापन’ याविषयी श्री नरेंद्र चोगले, ‘खेकडा पालनः काढणी आणि बांधणी (प्रात्यक्षीक) व्यवस्थापन. याविषयी श्री. सचिन साटम, ‘खेकडा पालनः रोग आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. आसिफ पागारकर आणि ‘खेकडा पालनः प्रकल्प अहवाल आणि अर्थशास्त्र’ याविषयी डॉ. के जे चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष या व्यवसाया मध्ये काम करीत असलेले गोवा येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी श्री. शुभम पवार यांनी ऑनलाईन गुगलमिटद्वारे खेकडा संच प्रत्यक्ष हाताळणी विषयी प्रात्यक्षीकासह अनुभव कथन केले तर रत्नागिरीतील श्री जफर वाडकर यांनी खेकडा पालन व्यवसायातील स्व: अनुभव कथन करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. प्रादेशिक कृषी कार्यालय, बर्डेझ, गोवा चे कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर यांनी गोव्यातील प्रशिक्षणांर्थी शेतकरी खेकडा पालन व्यवसाय सुरु करण्याबाबत ग्वाही दिली आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रशिक्षणांर्थी श्री. रुपेश महानंद ताम्हणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये खेकडा पालन संच बाबतीत गेल्या पाच वर्षापासून युट्युब वर अभ्यास करत होतो परंतु हा प्रशिक्षणा मध्ये प्रत्यक्ष संच अनुभव घेता आले व भविष्यात खेकडा पालन संच या व्यवसाय करण्याची हमी दिली. तर श्रीमती गौरी मायनाक हिने सर्व विषय मराठी भाषेतून शास्त्रोक्त व सोपा पद्धतीने शिकविल्यामुळे सहजपणे समजले व खेकडा पालन करणार असल्याचे सांगितले. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रमेश सावर्डेकर, श्री. श्रीकांत तांबे, श्रीमती जाई साळवी, श्री. दिनेश कुबल, श्री. महेश किल्लेकर, श्री. मनिष शिंदे, श्री. राजेंद्र शिरगावकर, श्रीमती भूमी भाटकर, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. राजेंद्र कडव, श्री. प्रविण गायकवाड तसेच कंत्राटी मजूर श्री. तेजस जोशी, श्री योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. पेडणेकर, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. केतन चव्हाण आणि श्री दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.



