Uncategorized

भारतीय सणांचे बाजारीकरण थांबविणे गरजेचे!

रत्नागिरी वाचनकट्टा ९ वे सत्र

रत्नागिरी. दि. २४
भारतीय परंपरा आणि पारंपारीक सण हे या देशातील श्रमण संस्कृती, कृषी संस्कृती आणि येथील भौगोलिकता याच्या शास्त्रशुध्द अभ्यास आणि वारसा यातून मुल्य, विचार , संस्कार आणि सर्वांगीण कलांना विकसीत करणारे आहेत मात्र सध्याच्या जागतिकीकरण , बाजारीकरण यांनी यांतील कलात्मकता आणि निखळ आनंदाची संवेदनाच मारुन टाकली आणि ते भडक बाजारु, पैशाची वारेमाप उधळण करत बिभत्सत्कडे नेत असल्याची खंत आज अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.
भारतीय सणांचा मुळ गाभा अत्यंत उदात्त आणि मानवतावादी आणि विश्वव्यापी आहे. मात्र गेल्या काही वर्षातील या सणांचे इव्हेंट मध्ये झालेले रुपांतर आणि राजकीय व इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपने त्याचा घेतलेला ताबा यांतून या सणांच्या माध्यमातून धार्मिक कट्टरतावाद वाढत असल्याची खंत काही जणांनी व्यक्त केली.
प्रा. गोपाळे सर यांनी भारतीय सणांच्या नव्या बदलाची गेल्या २-३ दशकांतील मांडणी अप्रतिम केली. या चर्चा सत्रात विजयानंद जोशी, अमर पवार, रश्मी कशेळकर, शिवराज गोपाळे, सुमित प्रतिभा संजय, वल्लभ वनजु
निहाल हातखंबेकर आदी अनेक उत्साही वाचस्पतींचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button