देश-विदेशमुख्य बातमी

अयोध्येतला “धर्मध्वज” केवळ ध्वज नाही तर भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं प्रतीक-मोदी

अयोध्या :अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवला. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरससंघचालक मोहन भागवत या सगळ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आज राम मंदिराच्या बाहेर फडकवण्यात आलेला भगवा ध्वज हे भारताच्या सभ्यतेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेचं प्रतीक झाली आहे. भारतासह संपूर्ण विश्व आज राममय झालं आहे. प्रत्येक राम भक्ताच्या हृदयात अद्वितीय संतोष आहे आणि असीम कृतज्ञता तसंच अपार आनंद आहे. शतकानुशतके झालेले घाव आता भरत आहेत, वेदनेला आता पूर्णविराम मिळतो आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे ज्याचा अग्नि ५०० वर्ष प्रज्ज्वलित होता असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आज स्थापन झालेला हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या झेंड्याचा भगवा रंग, त्यावर असलेला सूर्य, कोविदार वृक्ष हे सगळं रामराज्याचं किर्ती दाखवणारा आहे. हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे. संघर्षापासून सृजनाची गाथा म्हणजे हा ध्वज आहे. शतकांपासून चालत आलेल्या स्वप्नाचं साकार स्वरुप म्हणजे हा ध्वज आहे. येत्या शतकांमध्ये आणि हजार वर्षांपर्यंत हा धर्मध्वज प्रभू रामाचे आदर्श आणि सिद्धांत यांचा जयजयकार करत राहिल. हा धर्मध्वज आवाहन करत असेल की सत्यमेव जयते. हा धर्म ध्वज सांगतो आहे सत्यम एकपदम् ब्रह्म सत्यः धर्मः म्हणजेच सत्यच ब्रह्माचं स्वरुप आहे हे हा ध्वज सांगतो आहे. हा धर्म ध्वज प्रेरणा होईल प्राण जाये पर वचन न जाई या वचनाची. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button