मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेने केला सत्कार!

रत्नागिरी : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना भारत सरकारच्या निती आयोगाच्या मान्यतेने आशिया इंटरनॅशनल कल्चर या आंतरराष्ट्रीय अकॅडमी कडून डॉक्टरेट पदवी ने सन्मानित करण्यात आले आहे.

युयुत्सु आर्ते यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले असून त्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांकडून राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सध्या ते रत्नागिरी नमन महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आपतकालीन व्यवस्थापनात त्यांचा पुढाकार असतो . राजकीय क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे आर्ते यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

युयुत्सु आर्ते यांना डॉक्टरेट पदवी ने सन्मानित केल्याबद्दल त्यांच्यावर राज्यभरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजीत हेगशेट्ये तसेच नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी प्राचार्य घावळी, संजय वैशंपायन, सुकुमार शिंदे आदीं च्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button