क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण मॅरेथॉन; “एक धाव शिक्षणाच्या हक्कासाठी” हा संदेश घेऊन १२ जानेवारीला आयोजन

संगमेश्वर :नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित नवनिर्माण मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उत्साहात पार पडणार आहे. “एक धाव शिक्षणाच्या हक्कासाठी” या सामाजिक संदेशासह ही मॅरेथॉन सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत असून यंदाही हजारो धावपटू सहभागी होणार आहेत.

या मॅरेथॉनमध्ये ३ व ५ किलोमीटर अंतराच्या शर्यती घेण्यात येणार आहेत.

सकाळी ७.०० वाजता लहान गटातील मुले व मुली यांची ३ किमी शर्यत नवनिर्माण महाविद्यालय ते मयूरबाग युटर्न घेऊन पुन्हा महाविद्यालय येथे समाप्त होणार आहे.

त्यानंतर ७.१५ वाजता मोठ्या गटातील मुले व मुली यांची ५ किमी शर्यत नवनिर्माण महाविद्यालय ते बुरंबी युटर्न घेऊन पुन्हा महाविद्यालय येथे पूर्ण होणार आहे.

स्पर्धेची सांगता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संगमेश्वर येथे होणार असून, मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी धावपटूंनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या मॅरेथॉनला धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संगमेश्वर

संपर्क : 📞 9960215212 / 9370804219

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button