देश-विदेशमुख्य बातमी

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन” एल्डर लाईन १४५६७” हि टोल फ्री हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन” एल्डर लाईन १४५६७” हि टोल फ्री हेल्पलाईन ; सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी, सर्व राज्यांत सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फ़ौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फ़ौंडेशन द्वारे मोफत चालवली जात आहे. 

या राष्ट्रीय हेल्पलाइन चा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button