मुख्य बातमी

“रोटरी”तर्फे १७ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन 

जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताची टंचाई : जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकमेव शासकीय रक्तपेढीत सध्या खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या वतीने १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हॉटेल संगम रिजन्सी, रेल्वे स्टेशन रोड, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया चांगल्या प्रमाणात केल्या जातात, येथे रोज सर्व रक्तगटाच्या किमान ४० रक्तपिशव्यांची आवशक्यता असताना सध्या रक्तदात्यांच्या कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील रक्तकेंद्रामध्ये महिन्याभरापासून रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांना दारोदारी पळावे लागते. रक्तटंचाईमुळे शास्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहे. डेंगुबाधित, थालेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी रक्त मिळवण्यात अडचणी येत आहेत.जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्हाभरातील गरीब आणि गरजू रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठा करण्याच्या रुग्णालयाच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. म्हणूनच हे शिबीर आयोजित केले असून, या शिबिराचे नेतृत्व इव्हेंट चेअरमन संतोष राय (7276736551) आणि इव्हेंट कोऑर्डिनेटर वामन सावंत (9422631253) करत आहेत.

रक्ताचा तुटवडा हा चिंतेचा विषय असून रुग्णांना अनेकदा खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताच्या पिशव्या खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो, ज्या महागड्या असू शकतात आणि काही वेळा जास्त मागणीमुळे उपलब्धही नसतात. यावर उपाय म्हणून आम्ही रत्नागिरीतील सर्व नागरिकांना रक्तदानाच्या या उदात्त उपक्रमात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान केल्यानंतर सर्व रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र मिळेल, जे त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी रक्तपेढीमध्ये स्वत:साठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मोफत रक्त पिशवीसाठी पात्र करते. त्यामुळे जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आणि रक्तदाते म्हणून नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करावा, असे आवाहन रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रोटे. हिराकांत साळवी आणि इनर व्हील क्लबचे प्रेसिडेंट डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button