मुख्य बातमीविधानसभा निवडणूक २०२४

रत्नागिरीत मतदान प्रक्रियेसाठी वाहतूक आराखडा तयार

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेसाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.

मतदानासाठी आता कमी दिवस राहिल्याने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे तसेच अन्य मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची सध्या धांदल सुरू आहे. उद्यापासून (१२ नोव्हेंबर) कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सुरू होणार आहे. या सर्व दृष्टीने आवश्यक असलेल्या वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रे तसेच कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या वाहनांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. येत्या १२ नोव्हेंबरला दोन दिवसांचे मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशिक्षण होणार आहे. यासाठी आवश्यक वाहनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ६७ मार्गही निश्चित केले आहेत. वाहतूक आराखड्यानुसार कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आणि मतदान प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५५ गाड्या आवश्यक आहेत. त्यादृष्टीने महामंडळाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. तसेच २५ मिनीबस आणि २२ जीप तयार ठेवाव्या लागणार आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग यांच्यासाठी गृहमतदान होणार आहे. यापैकी ज्या मतदारांनी गृहमतदानाची सुविधा मिळण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यांच्यासाठीच ही सुविधा देण्यात येणार आहे. यासाठीही ३८ वाहने तयार ठेवण्यात येणार आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ३६ वाहने लागणार आहेत. त्यादृष्टीनेही या सर्व वाहनांची निश्चिती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button