मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात “उद्योजकता” विषयावर कार्यशाळा

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डिपार्टमेंट ऑफ बीएमएस आणि इनक्युबॅशन सेंटर यांच्यावतीने महाविद्यालयात “उद्योजगता” या विषयावर २१ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या वेळी नित्य प्रणित हीलिंग सेंटरचे तेजस महागावकर, मंथन स्कूल ऑफ आर्ट्सचे संदेश पाले आणि प्रेरक वक्ता प्रतीक कळंबटे यांनी मार्गदर्शन केले. एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांना महाविद्यालयात आमंत्रित करून त्यांच्याकडून ज्ञान मिळविण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या वेळी आयोजित कार्यक्रमात वक्त्यांनी बीएमएसमधील मुलांना उद्योजग होण्यासाठी काय करावे, त्याचे नियोजन महाविद्यालयीन वयातच कसे करावे, उद्योजक होण्यासाठी लागणारी गुण वैशिष्ठ्ये आदी मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी राजेश शेट्ये, तुषार आंग्रे, अथर्व शेट्ये आणि राम कोलवणकर तसेच नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. आशा जगदाळे याही उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button