राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते आपल्याला घडवायचे आहेत: भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण.

रत्नागिरी : पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अनेक पाकिस्तानी आतंकवादी तळ उध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. आपला देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर असून आत्ताच्या स्थितीला आर्थिक दृष्ट्या जगात तिसऱ्या स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या योजना आखत आहेत त्या योजना आणि त्यांची माहिती पोचवण्याचे काम आपले आहे, राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते आपल्याला घडवायचे आहेत असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजापूर येथे केले.
राजापूर येथे भारतीय जनता पक्ष लांजा साखरपा राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजापूरचे माजी अध्यक्ष अभिजीत गुरव, माजी अध्यक्ष सुरेश गुरव, विद्यमान तालुकाध्यक्ष मोहन घुमे, राजापूर पूर्वचे तालुकाध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, भाजपा महिला आघाडीच्या शिल्पा मराठे, लांजा उत्तरचे तालुकाध्यक्ष विराज हरमले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा निर्माण करायची आहे. मी एक नेता आहे असं मी स्वतःला समजत नाही. तर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि या नात्याने तुम्ही मला कधीही हाक मारा मी हाकेला तात्काळ प्रतिसाद देऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहीन. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. ही गोष्ट आपल्या देशवासींसाठी अभिमानाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे कार्य तळागाळात पोचवण्यासाठी कामाला लागा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयजयकार झाला पाहिजे. 140 कोटी जनतेला विकासाकडे नेणे आणि समृद्ध भारत घडवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. आणि त्यांचे हे कार्य पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. गावागावात काम करत असताना आपण भाजप कार्यकर्त्यांनी जुने मतभेद हेवेदावे विसरून काम केले पाहिजे. असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी यावेळी



