मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मातृमंदिर च्या “माहेरवाशिण मेळाव्या” चे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे हस्ते

गोकुळ साठी ५० लाखाचा निधी देणार व मातृमंदिर हॅास्पिटलसाठी सी एस आर मधून निधी देणार

देवरुख : मातृमंदिर च्या गोकुळ (अनाथालय) बालगृहाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “माहेरवाशिण मेळाव्या” चे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.

या संस्थेकरिता CSR च्या माध्यमातून गोकुळ साठी ५० लाखाचा निधी देणार

मातृमंदिर गोकुळ ही देशातील एकमेव महत्वाची माझ्या जिल्ह्यातील सेवाभावी संस्था आहे.

मावशींचे ऋण यासाठी मोठे आहे. माझ्या विभागामार्फत योग्य ते सहकार्य मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला डॉ. प्रदीप ढवळ, श्री. विजय सराटे, श्री. रवींद्र पोखरकर, श्री. अभिजित हेगशेट्य, सौ. मेघना चाळके, डॉ. समिधा गोरे, श्री. रोहन बने, श्री. प्रमोद पवार, श्री. विनय पानवलकर, श्री. विलास कोळपे तसेच गोकुळ अनाथालयाच्या महिला भगिनींची उपस्थिती कार्यक्रमात विशेष ऊर्जा देणारी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button