मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

टंचाई वरती मात करण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण महत्त्वाचे ! भरत चौगुले – गट विकास अधिकारी, संगमेश्वर

देवरुख : जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण माटे भोजने सभागृह देवरुख येथे दिनांक २६.०५ .२५ ते ३०.०५.२५ या दरम्यान आयोजित केलेले होते.

या प्रशिक्षणाला गटविकास अधिकारी भरत चौगुले , सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद शिंदे’ उपअभियंता (ग्रा.पा. पु )अभिजीत कांबळे , विस्ताराधिकारी (ग्रा.पं) शंकर घुले यांच्या उपस्थित शुभारंभ पार पडला.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी गट विकास अधिकारी श्री भरत चौगुले यांनी टंचाई वरती मात करण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून, कोकणात 3000 ते 3500 मिमी पाऊस पडूनही 3 महिन्यासाठी लोकांना पाण्यासाठी इतर स्त्रोतावरती अवलंबून राहावे लागते किंबहुना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, अशावेळी दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

प्रशिक्षणादरम्यान o५जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर कांदळवन रोपाचे व SWSM स्तरावरून देण्यात आलेले FTK kit चा तालुकास्तरावर शुभारंभ करून प्राथमिक स्वरूपात ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button