मान्सूनचा प्रवास ३० मे नंतर थंडवणार !

मुंबई :- यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सूननं महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे.
केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. राज्यात गेल्या आठवड्या पासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान आता मान्सूनसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
30 मे नंतर पावसाचा प्रवास थंडावणार असल्यानं शेतकऱ्यांनी 100 मिली मीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात धडाक्यात आगमन झालेल्या मान्सूनचा प्रवास 30 मे नंतर काहीसा थंडवणार आहे.
यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. यंदा 108 टक्क्यांच्या आसपास पावसाचं प्रमाण राहू शकतं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
देशाच्या दक्षिण आणि मध्य भागांमध्ये यंदा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.



