मुख्य बातमी

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज (५ सप्टेंबर) शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली.

सन २०२४-२५ साठी ऑनलाइन पद्धतीने २५ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले होते. त्या सर्व शिक्षकांच्या जिल्हास्तरिय निवड समितीने मुलाखती घेतल्या. तसेच आदर्श पुरस्काराच्या निकषाप्रमाणे त्या शिक्षकांचे गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन लेखन व व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य, साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा अभ्यासात मागे, शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शैक्षणिक उठाव असे निकष तपासण्यात आले. त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करण्यासाठी प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आले होते. त्याची मंजूरी आल्यानंतर आज मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार यांनी हे पुरस्कार जाहीर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच पुरस्कार वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, प्रशासन अधिकारी संजय नलावडे उपस्थित होते.

पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे अशी : अहमद हसीनमिया नाडकर (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा धुत्रोली उर्दू, मंडणगड), महेश पांडुरंग गिम्हवनेकर (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा आसूद नं. १, दापोली), संतोष बाळकृष्ण बर्वे (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धामणदेवी बेलवाडी, खेड), मौला गुलाब नदाफ (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढे तर्फे चिपळूण, चिपळूण), राहुल साधू आमटे (उपशिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे नं. १, गुहागर), कारभारी लहानू वाडेकर (उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेड खुर्द नं. १, संगमेश्वर,) माधव विश्वनाथ अंकलगे (उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी, रत्नागिरी), उमेश केशव केसरकर (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नं. १, लांजा), सुहास पांडुरंग दोरुगडे (पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नं. १, राजापूर). विशेष पुरस्कार : श्रीमती कुंदा मुलू मोरे (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पिंपळी खुर्द, चिपळूण).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button