मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर येथे ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग व टॅटू मेकिंग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा .

कलेतून संधी निर्माण होतात ग्राफिक डिझायनर - अमोल नागप व संदेश वेल्ये

संगमेश्वर :नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील जाहिरात कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी एक दिवशीय ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग व टॅटू मेकिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत ग्राफिक डिझाईनिंग, आर्ट रायटिंग, टॅटू मेकिंग, स्केचिंग, बॉल पेंटिंग, अक्षर गणेश आदी कलाक्षेत्रांतील व्यावसायिक संधी, आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके तसेच करिअर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कला व डिझाईन क्षेत्राची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेसाठी श्री. संदेश वेल्ये (ग्राफिक मेकर, टॅटू अँड डिझायनर) हे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या अनुभवातून त्यांनी व्यावसायिक डिझाईन विश्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच कलाकार संदेश गेल्ये आणि कलाकार अमोल नागप (ग्राफिक मेकर, टॅटू अँड डिझायनर) यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डिझायनर अमोल नागप म्हणाले की, ग्राफिक्स व टॅटू मेकिंगला जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कला कधीही संपत नाही; संधी मिळाल्यानंतर तिचे सोने करणे आवश्यक आहे. स्केच रेखाटने ही मूळ संकल्पना असून ती ग्राहकांच्या आवडीनुसार विकसित करणे गरजेचे आहे. आजच्या युगात जाहिरातीचे महत्त्व वाढले असून ग्राहकांना हवे ते दिल्यास ते किंमत देण्यास तयार होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मार्गदर्शक संदेश वेल्ये यांनी कला ही आपल्या परिस्थितीवर मात करण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. कला कधीही मरत नाही; ती प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. उपलब्ध संधींचा योग्य लाभ घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य मा. संजना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. पदवीधर शिक्षणासोबतच कला कौशल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळते, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाहिरात कला विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. प्रशांत जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या प्राध्यापक वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button