मुख्य बातमी

आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांशी जोडली जात आहे : अभिजीत पाटील

अलिबाग : आदर्श पतसंस्था सर्व परिवाराला लागणार्‍या सोयीसुविधा देत आहे. लहान मुलांना मनी बॉक्स, कॉलेजमधील मुलांना मोबाईल अ‍ॅप, ज्येष्ठ सभासदांना डोअर स्टेप सेवा, महिलांना खास महिला अधिकार्‍यांकडून सेवा व नवनवीन योजना आणत आहे. आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे , असे आवाहन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांनी सभासदांना केले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुरूळ येथील क्षात्रैक्य चौकळशी माळी समाज सभागृहात झाली. त्यावेळी आपल्या भाषणात अभिजीत पाटील यांनी आदर्श पतसंस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक सादर केले.

रौप्यमहोत्सवी वर्षात ५५ कोटी १३ लाख ५१ हजार रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. ठेवी ३५८ कोटी ५ लाख २५ हजाराच्या झाल्या आहेत. ठेव वाढीचे प्रमाण १८.२० टक्के आहे. २६० कोटी ५२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. एकत्रित व्यवसाय ६१८ कोटी ५७ लाख रुपयांचा झाला आहे. संस्थेला ६ कोटी १० लाखांचा नफा झाला आहे. संस्था कर्ज जलद वाटप करण्यासाठी तंत्रज्ञान आणत आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

खोपोली, कर्जत व बोर्ली – मांडला येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा व खोपोली येथील  शाखेसाठी स्वमालकीची जागा विकत घेण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तसेच गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही सभासदांना ११ टक्के दराने लाभांश जाहीर केला .

आदर्श पतसंस्थेने लहान मुलांसाठी अनन्या बचत ठेव योजना सुरू करून त्यांचा बचतीची सवय लावली आहे. या योजनेचे ८ हजार  खातेदार आहेत. या योजनेत १० हजार खातेदार करायचे उद्दिष्ट आहे. यावर्षी संस्थेचा एकत्रित व्यवसाय ८०० कोटी रुपयांचा करायचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

या सभेला संस्थेचे उपाध्यकक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, अ‍ॅड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, अ‍ॅड.  रेश्मा पाटील, अ‍ॅड. वर्षा शेठ, सुरेश गावंड,  भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरिवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले, कार्यलक्षी संचालिका मीनाक्षी पाटील आदींची उपस्थिती होती.

सभेपूर्वी झालेल्या सभासदांच्या प्रशिक्षण शिबिरात तानाजी पानसकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कर्मचारी राकेश घरत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button