मुख्य बातमीराजकीय

गोळप पंचायत समिती गणाच्या ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुखपदी गणेश सुर्वे यांची नियुक्ती

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गटातील गोळप पंचायत समिती गणाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपविभागप्रमुखपदी रनपार गावचे गणेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना संघटना वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभागप्रमुख प्रकाश उर्फ बावा साळवी, सभापती मंगेश साळवी, पावस विभागप्रमुख किरण तोडणकर, उपविभाग प्रमुख दत्ताराम शेठ तांबे, उपविभाग प्रमुख सचिन भुवड, शाखाप्रमुख शालीमार कीर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गुरव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button