रत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण टाइनी टॉट्स च्या प्री प्राइमरी गटातील विद्यार्थ्यांचा दिक्षात समारंभ संपन्न. 

रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून सुरू होऊन मार्चला संपते .

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण टाइनी टॉट्स च्या प्री प्राइमरी वयोगटातील विद्यार्थ्यांना हे वर्ष संपून आपण पुढील शैक्षणिक वर्षात मोठ्या वर्गात जाणार आहोत याचा आनंद होता , याचेच औचित्य साधून या विद्द्यार्थ्यांचा दिक्षात समारंभाचे आयोजन करण्यात आले .

या आधुनिक जगात कोणताही उत्सव हा सोहळा म्हणून साजरा केला जातो या सोहळ्याचे सूत्र संचालन सिनिअर के जी च्या वर्गशिक्षिका लुबना डावे यानी केले, आपल्या प्रस्तावनेत त्यांनी वर्षभर केलेल्या प्रयोगात्मक शिक्षणाचा आढावा दिला . त्याच्या वर्गातील युवान शर्मा , जिया गराटे, राधा यादव , जीया सूर्यवंशी, अद्विका देशमुख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मोठ्या भावंडाचे मनोरंजन करण्यासाठी जूनियर के जी तसेच नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाचातून त्यांना बाय बाय केले .

शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेच्या संचालीका सीमा हेगसेट्ये तसे चेअरमन अभिजित

हेगशेट्ये यांनी मुलांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या, शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानून नमिशा लिंगायत यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमास सर्व पालक व विद्याथी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button