मुख्य बातमीराजकीय

माजी खासदार विनायक राऊत उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत उद्या (४ जानेवारी) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम असा : शनिवारी (४ जानेवारी) सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईवरून रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कै. सुहास (कुमार) वामन शेट्ये यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वन भेट. दुपारी १२ वाजता निवे खुर्द येथील 4जी बीएसएनएल टॉवर उद्घाटन समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती (ता. संगमेश्वर). दुपारी १२.३० वाजता बेलारी (ता. संगमेश्वर) येथील 4जी बीएसएनएल टॉवर उद्घाटन समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी १ वाजता माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंजूर केलेल्या महिपतगड येथील परिसर सुशोभिकरण व पर्यटकांसाठी मुलभुत सुविधा निर्माण करणे रक्कम ३४९.९० लाख या कामाच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती (ता. संगमेश्वर). दुपारी २ वाजता सिंधुदुर्गकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button