मधुमिलिंद प्रतिष्ठानतर्फे २० एप्रिलला सांगितिक कार्यक्रम

रत्नागिरी : येथील मधुमिलिंद प्रतिष्ठानतर्फे ‘राम गाईन आवडी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम २० एप्रिलला सायंकाळी ६.३० ते ९ या वेळेत शिर्के हायस्कूलमधील रंजन मंदिरात होणार आहे.
या कार्यक्रमात सावंतवाडी येथील स्वप्नील गोरे, दापोली येथील अभिषेक जोशी, रत्नागिरीतील सौ. तृप्ती महाजन, सौ. करुणा पटवर्धन गायन करणार आहेत. कार्यक्रमात ऑर्गनसाथ विलास हर्षे, तबलासाथ सचिन भावे, सिंथेसायझरसाथ राजू किल्लेकर पखवाजसाथ मंगेश चव्हाण व्हायोलिनसाथ उदय गोखले, तालवाद्यसाथ हरेश केळकर देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन सौ. दर्शना बापट करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रवेशिका मूल्य १०० रुपये असून, त्या खादाडी कट्टा, जोशी पाळंद, पितांबरी शॉपी, टिळक आळी आणि केळकर उपहार गृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे उपलब्ध असणार आहेत.
कार्यक्रमविषयी :
दिवस : शनिवार, २० एप्रिल २०२४
वेळ : सायंकाळी ६.३० ते रात्री ९
स्थळ : या रंजन मंदिर, शिर्के हायस्कूल, माळनाका.



