मुख्य बातमी
नवरात्रीनिमित्ताने नवदुर्गा दर्शन यात्रेला आजपासून प्रारंभ
५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आणि युक्ता फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या सौजन्याने नवरात्रीनिमित्ताने ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत नवदुर्गा दर्शन यात्रेला आजपासून (५ ऑक्टोबर) प्रारंभ झाला.
माजी खासदार तथा शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते या उपक्रमाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, तसेच महिला उपजिल्हा संघटक ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग, महिला शहरप्रमुख मनिषा बामणे यांच्यासह सर्व महिला विभागप्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.



