रत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 97%

रत्नागिरी :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला असून यात नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल चा निकाल 97 टक्के लागला आहे .

10वी परीक्षेत 

प्रथम क्रमांक – राधेय रवींद्र धोपट 97% त्यास मराठी विषयात 100 पैकी 100 मार्क

द्वितीय क्रमांक – ईशान गिरीश सुर्वे 91.60% 

तृतीय क्रमांक – दुर्वांक विजय गुरसाळे 91.20%

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 13 मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला .यंदा उत्तीर्ण तेचे प्रमाण ९७% इतके आहे 2023 च्या तुलनेत यावर्षी देखील उत्तीर्ण टक्केवारीत थोडीशी वाढ झालेली आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा 97% लागला असून बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.६६ लागलेला आहे .

नवनिर्माण मध्ये दहावीचे 45 विद्यार्थी व बारावीचे 18 विद्यार्थी परीक्षेत बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेटे,संचालिका सीमा हेगशेटे, मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button