मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते उदघाटन.

चिपळूण तालुक्यातील मांडकी पालव येथील चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते उदघाटन झाले. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल कामं करील व सुदृढ पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करील असा विश्वास यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.

डॉ तानाजीराव चोरगे सरांच्या माध्यमातून होणारे हॉस्पिटल हे रत्नागिरी जिल्ह्याच्या वैभवात भर घालील हा विश्वास ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. स्वच्छ व शिस्तबद्धता हा चोरगे सरांचा गुणधर्म आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे असेही यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी अभिमानाने सांगितले.

अतिशय मोठी दूरदृष्टी ठेवून चोरगे सरांनी आपल्या भागात अनेक संस्था चालू केल्या व या भागातील नागरिकांच्या भवितव्यासाठी काम केले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा होईल असा विश्वास मला असून हे हॉस्पिटल रुग्णसेवेत एक आदर्श निर्माण करून देईल असाही विश्वास ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना सारख्या संकटातही अतिशय चांगल्या प्रकारे कामं केल्याबद्दल ना. उदय सामंत ह्यांनी कौतुकही केले. तसेच महाराष्ट्रातच नाही तर देशात हे हॉस्पिटल नावारुपाला येईल असेही ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी सांगितले. चोरगे सर हे ग्रामीण साहित्यातही काम करत आहेत आणि ग्रामीण भागाचा वारसा पुढे नेण्याचे कामही करत असल्याने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला साजेसं कामं याठिकाणी होवो अशा शुभेच्छा ना. उदय सामंत ह्यांनी दिल्या.

यावेळी आमदार शेखर निकम, डॉ.तानाजीराव चोरगे, सौ.अंजली चोरगे, श्री.बाबाजीराव जाधव, डॉ. अनिरुध्द आठल्ये, डॉ. यतिन जाधव, श्री. सचिन पाकळे, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button