मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

बावनदी धरणावरील बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा संपन्न.

देवरुख :- देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बाव नदीवर धरण बांधकामाचा भूमीपूजन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याचा निर्णय ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी जाहीर केला. संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी आवर्जून सांगितलं.

देवरुख शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे, असं नियोजन नगरपंचायत प्रशासनानं केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून ५० हजार मुलींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय, असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा आहे, हे देखील यानिमित्तानं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थितांना सांगितलं.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, जि.प. चे माजी सभापती बाबू म्हाप, देवरुख नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मृणालताई शेट्ये, उपनगराध्यक्ष अभिजीतजी शेट्ये, दोन्ही गावचे सरपंच, उपतालुका प्रमुख सचिन मांगले, तहसीलदार श्रीमती साबळे, मुख्याधिकारी श्री. विसपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख हनिफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुलजी भुवड, वैभव पवार यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button