महाराष्ट्र राज्यरत्नागिरी जिल्हा वृत्त

रत्नागिरीतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात येईल असा सुतोवाच केला होते.

या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या रत्नागिरी तहसीलदार कार्यालय यांच्या इमारतीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. विकास कुमरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील क्लार्क उदय नाखरेकर, सोशल सर्विस सुप्रिटेंडंट अनिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. शुभम वाघधरे यांनी ना. उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button