मुख्य बातमीशैक्षणिक

सर्वसामान्य कुटुंबातील करणकुमार झाला मास्टर

डॉ. करणकुमार कररा भौतिकोपचार तज्ञ या विषयात प्रथम तर विद्यापीठामध्ये द्वितीय

चिपळूण : घरात कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय सर्वसामान्य अशा कुटुंबातील करणकुमार व्यंकटेश कररा याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भौतिकोपाचार तज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमात उत्तम यश संपादन केले आहे. भौतिकोपाचार (फिजिओथेरपी) या विषयात प्रथम, तर विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

अलोरे (ता. चिपळूण) या गावातील सर्वसामान्य कररा कुटुंबातील वेंकटेश्वरराव कररा (वडील) व पद्मलता कररा (आई ) याचा मुलगा करणकुमार. लहानपणापासून अभ्यासू असणाऱ्या करण याला डॉक्टर व्हायचे होते. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च करण्याइतकी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही वडिलांनी पूर्ण पाठिंबा देत मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. करण याने अलोरेमधील मंदार एज्युकेशन सोसायटी येथे प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न त्याने बघितले आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने ते भरघोस यश मिळवत पूर्ण केले.

जवळपास कोणत्याही विद्यापीठामध्ये जागा शिल्लक नसल्याने उच्च शिक्षणासाठी बेंगलोर येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी मधील हर्षा इन्स्टिट्यूट ऑफ फिजिथेरपीमध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल (पिंपरी- चिंचवड, पुणे) येथे काम पूर्ण केले. त्यानंतर फिजिओथेरपी मास्टर्स होण्यासाठी दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी कराड कृष्णा विश्व विद्यापीठ येथे प्रशिक्षण पूर्ण करून मधुमेह आणि हृदयविकार बायपास सर्जरी या विषयावर रिसर्च करून त्याने प्राविण्य संपादन केले आहे.

मेहनत, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर त्याने मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट म्हणून हे सुयश मिळवले आहे. डॉ. करण कुमार कररा (मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट) याची रत्नागिरी जिल्हा तसेच चिपळूण तालुक्यात कार्यरत होणार आहे. डॉ. करणकुमार कररा यांनी मास्टर ऑफ फिजिओथेरपीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याने विद्यालयाचे कृष्णा विश्वविद्यापीठ कराड भौतिकोपचार महाविद्यालयीन प्रमुख डॉक्टर वरादराजुळू, विभाग प्रमुख डॉ. पू. विष्णू देवी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. करणकुमार याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button