संपर्क युनिक फाउंडेशनचा गोकुळ अनाथालयला अभ्यास दौरा

रत्नागिरी : येथील एनजीओ संपर्क युनिक फाउंडेशनने यावर्षी देवरूखमधील (ता. संगमेश्वर) मातृमंदिर संस्थेचे गोकुळ अनाथालयाचा अभ्यास दौरा केला आणि तेथील अनाथ मुलींसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेली सात वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत आहे. संस्थेमार्फत दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका संस्थेत जाऊन तेथील लोकांसोबत हा राष्ट्रीय सण साजरा करते. यंदा देवरूखमधील मातृमंदिर संस्थेचे गोकुळ अनाथालय या संस्थेत संपर्क युनिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा केला.
यावेळी तेथील मुलींना जिलेबी आणि भेटवस्तू देण्यात आल्या आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत अतिशय आनंदाने हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी ‘संपर्क’चे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, सचिव युसूफ शिरगांवकर, सल्लागार रमजान होडेकर, महिला संघटक सौ. जया डावर, को-ऑर्डिनेटर सौ. निकीता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



