क्रीडारत्नागिरी जिल्हा वृत्त

कोल्हापूर राज्य कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची आकांक्षा कदम विजेती.

रत्नागिरी : शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर २५-७, २५-१५ अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेला २५-११, २५-१९ असे हरविले. विजेत्या पहिल्या आठ खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव योगेश फणसळकर, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव, छत्रपती शंभूराजे मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व प्रमुख पंच सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे

आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि  x प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २१-१९, १२-२५, १९-१७

केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) वि  x मधुरा देवळे ( ठाणे ) १८-५, २१-२०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button