मुख्य बातमी

कुवारबाव आरटीओ नाका ते रॉयल इनफिल्ड शोरुम मार्गावर २३ नोव्हेंबरला सर्व वाहनांना प्रवेश बंद

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व वाहनांना कुवारबाव आर.टी.ओ नाका ते रॉयल इनफिल्ड शोरुम (रेल्वे ब्रीज) या रस्त्यावर येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज (१९ नोव्हेंबर) दिले.

कुवारबाव आरटीओ नाका-कांचन हॉटेल-रेल्वे ब्रीज अलिकडे हॉटेल श्रद्धा या बोर्डा जवळून माऊली किराणा स्टोअर्स-क्लासिक ऑटो सर्व्हिस-सिद्धी फर्निचर-साक्षी फूड-महाराष्ट्र कृषी उद्यो ग विभाग कार्यालय- रॉयल इनफिल्ड शोरुम (रेल्वे ब्रीज) या पर्यायी मार्गे वाहतूक वळविण्यात यावी, असेही यात म्हटले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी परिसरात वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून यावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५अन्वये वरील आदेश देण्यात आला.

वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button