नवनिर्माण महाविद्यालय, संगमेश्वरमध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न.

संगमेश्वर: नवनिर्माण कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये वतीने रानभाज्या महोत्सव उत्साहात पार पडला . महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे फायदे पुढील पिढीला कळावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने हा महोत्सव भरविण्यात आला होता.
पावसाळ्यात आपल्या आसपासच्या परिसरात रानभाज्या उपलब्ध होत असतात. या सर्व रानभाज्या वेगवेगळ्या चवीच्या तसेच वेगवेगळे औषधी गुणधर्माने युक्त असतात. यातील काही भाज्या आपल्याला माहित असतात मात्र अनेक रानभाज्यांविषयी आपल्याला माहिती नसते. काही वेळा या भाज्या चुकीच्या पद्धतीने बनवल्या जातात त्यामुळे अनेक जण याचा आहारात वापर करताना दिसत नाहीत. नवीन पिढीला रानभाज्यांचे गुणधर्म व त्यांचे संवर्धन यांची प्रेरणा मिळावी या हेतूने हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन नवनिर्माण कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, यांच्या हस्ते पार पडला. या वर्षी ट्रेडिशन टू इनोवेशन ही संकल्पना राबविणात आली.विशेषता लहान मुलांच्या आहारात रान भाज्यांचा समावेश व्हावा यासाठी ही थीम घेण्यात आली होती.यामधे रानभाजी पासून बनविलेले पिज़्ज़ा, पास्ता, बर्गर ,कटलेट हे विशेष आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख भिकाजीराव बेहरे आणि प्रा.मितेश पवार व प्रा.निकिता कदम यांनी केल.



