क्रीडामुख्य बातमी

आमदार चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा ६ जुलैला

रत्नागिरी : लांजा-राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व लांजा तालुका कॅरम असोसिएशन यांच्या वतीने आमदार चषक ही वर्षातील पहिली जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ लांजा येथील कुणबी सेवा संघ हॉल येथे ६ जुलै ते ७ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटांत होणार आहे. स्पर्धेसाठी एकेरी गटासाठी १५० रुपये व दुहेरी गटासाठी ३०० रुपये असे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासहीत तालुका प्रतिनिधींकडे जमा करायच्या आहेत. स्पर्धेत खेळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला पांढरा रंगाचा टीशर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.
तालुका प्रतिनिधी असे : गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा – विलास इंदुलकर (९४०३७६९४४९), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६)
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी यांची, तर स्पर्धा प्रमुख म्हणून अमित देसाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन लांजा तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांच्यासह लांजा तालुका कॅरम असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button