मुख्य बातमी

माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले

संगमेश्वर तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली

संगमेश्वर : तालुक्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शास्त्री, सोनवी आणि बावनदी आणि गडनदीने रौद्ररूप धारण केले असून आज संध्याकाळी माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त केले आहे. शेतीमधील कामांनी वेग घेतला आहे. पावसामुळे भात मळीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. नालेही भरून वाहू लागले आहेत . दुपारनंतर पावसाचा जोर वाढू लागल्याने नदी काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शास्त्री आणि सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या रहिवाशीयांना स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button