मुख्य बातमीराजकीय

रत्नागिरी भाजपातर्फे नाचणे रोड शहर बस थांबा लोकार्पण सोहळा

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) माजी बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वैयक्तिक स्वनिधीतून तसेच महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या पुढाकारातून शहरातील नाचणे रोडवरील सहकार नगर व पावर हाऊस प्रवासी मार्ग निवाऱ्याचा लोकार्पण सोहळा २ फेब्रुवारी रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

सहकार नगर व नाचणे पावर हाऊस या ठिकाणी प्रवासी बस थांबा शेड नसल्याने लोकांना उन्हामध्ये बसची प्रतीक्षा करत उभे राहावे लागत होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना उन्हा-पावसात उभे राहण्यासाठी निवारा शेड भाजपाच्या माध्यमातून बांधण्यात आली. या कामाचे स्थानिक लोकांनी कौतुक केले आहे.

 

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे, शहर अध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, नीलेश आखाडे, उमेश देसाई, नुपुरा मुळ्ये आदी भाजपा पदाधिकारी व स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार नगर व पावर हाऊस येथील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होताच सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. व स्थानिकांनी आपल्या कोणत्याही कामासाठी भाजपा पदाधिकारी नीलेश आखाडे, राजेंद्र पटवर्धन, प्राजक्ता रूमडे, भक्ती दळी, सायली बेर्डे यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सावंत यांनी नागरीकांना केले. लोकार्पण सोहळ्यास भाजपचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते व नवलाई नगर, सहकार नगर, पावर हाऊस येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button