बाबरशेख क्रीडा मंडळ हातीस यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : शहराजवळील हातीस येथील बाबरशेख क्रीडा मंडळाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हे या शिबिराचे नववे वर्ष होते.
यावेळी महेश तोडणकर, रूपेश (बाळू) नागवेकर, अनिकेत नागवेकर, रोहन ठावरे, बंटी नागवेकर, अक्षय नागवेकर, पारस आंबुलकर, दीपाली रसाळ, मयुर तोडणकर आदी उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हातीस जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी रक्तदान केलेल्या दात्यांना मंडळाकडून विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी अनिकेत सुभाष नागवेकर, राजेश विश्वनाथ नागवेकर, प्रशांत मनोहर नागवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. आकांक्षा पाचपुते, डॉ. विनोद जाधव यांच्याकडून बाबरशेख क्रीडा मंडळाचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हातीस ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष संदेश नागवेकर, सौ. प्रेरणा नागवेकर, सुमित गोवेकर, सुहास, सुदर्शन, सुयोग, समिल नागवेकर आणि क्रीडा मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.



