रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे मुलींची इनडोअर टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित मुलींचे इनडोअर टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा २८ फेब्रुवारी व १ मार्च या कालावधीत शांतीनगर येथील बाजार समितीच्या आर्टिफिशल टर्फ (कृषी भवन) येथे होणार आहेत. या इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष व राजापूर विधानसभा आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघाना प्रवेश दिला जाईल. संघानी २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजेपर्यंत आपल्या संघाची नावे सह सचिव बलराम कोतवडेकर (9921003394) यांच्या जवळ कळवावी.
स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपीन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.



