महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. १९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button