सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार (२० फेब्रुवारी) रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजता महाड ते कशेडी, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज २ ची पाहणी (२० किमी). दुपारी ४ ते ४.३० वाजता कशेडी बोगदा, राष्ट्रीय महामार्ग सा. बां. विभाग पॅकेज ३ ची पाहणी (९ किमी). दुपारी ४.३० ते सायंकाळी ५ वाजता कशेडी ते परशुराम, राष्ट्रीय महामार्ग सा. बां. विभाग पॅकेज ४ ची पाहणी (४२ किमी). सायंकाळी ५ ते ५.४५ वाजता परशुराम-चिपळूण- आरवली, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-५ ची पाहणी (३५ किमी). सायंकाळी ५.४५ ते ६.३० वाजता आरवली ते कांटे, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ६ ची पाहणी (४० किमी). सायंकाळी ६.३० ते ७ वाजता कांटे ते हातखंबा, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-७ (१० किमी) व हातखंबा ते रत्नागिरी, राष्ट्रीय महामार्ग (१५ किमी) ची पाहणी. सोईनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह येथून प्रयाण. सकाळी ९ ते ९.१५ वाजता रत्नागिरी ते हातखंबा (१५ किमी). सकाळी ९.१५ ते १०.१५ वाजता हातखंबा ते वाकेड, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ७ ची पाहणी (४० किमी). सकाळी १०.१५ ते दुपारी १ वाजता ओणी- अणुस्कुरा घाट कोल्हापूरमार्गे प्रवास (१०० किमी).



